Akshata Chhatre
आजच्या धावपळीच्या जीवनात प्रदूषण, ताणतणाव आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे केस गळणे, अकाली पांढरे होणे यांसारख्या समस्या वाढल्या आहेत.
महागडी रासायनिक उत्पादने वापरण्याऐवजी नैसर्गिक आणि घरगुती उपायांकडे वळणे अधिक फायदेशीर ठरते.
मोहरीचे तेल केसांच्या मुळांशी पोहोचून त्यांना पोषण देते आणि रक्ताभिसरण सुधारते. यामुळे केस मजबूत होतात.
या तेलाच्या नियमित वापराने केसगळती कमी होते आणि नवीन केस वाढण्यास मदत होते.
हे तेल केसांना नैसर्गिक काळेपणा टिकवून ठेवण्यास आणि चमकदार बनवण्यास मदत करते.
मोहरीच्या तेलात कढीपत्ता मिसळल्यास त्याचा फायदा दुप्पट होतो.
कढीपत्ता केसांच्या मुळांना ताकद देतो आणि अकाली केस पांढरे होण्यापासून रोखतो.