केसांच्या वाढीला ब्रेक लागलाय? 'हा' उपाय करा आणि मिळवा लांबसडक केस

Akshata Chhatre

कोरडे केस

ऋतू बदलताना केसांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होतो. विशेषतः पावसाळ्यात केस कोरडे, निस्तेज होतात आणि कोंड्यामुळे अधिक तुटू लागतात.

hair growth remedy|long hair solution | Dainik Gomantak

रासायनिक उत्पादने

अशा वेळी महागडी रासायनिक उत्पादने वापरण्याऐवजी घरगुती, नैसर्गिक उपाय अधिक फायदेशीर ठरतात.

hair growth remedy|long hair solution | Dainik Gomantak

अळशीच्या बिया

अळशीच्या बियांनी बनवलेलं हेअर जेल हे केसांसाठी एक उत्तम पर्याय आहे.

hair growth remedy|long hair solution | Dainik Gomantak

केसांना पोषण

यामध्ये असणारे ओमेगा-३ फॅटी अॅसिड, व्हिटॅमिन ई, अँटीऑक्सिडंट्स आणि लिग्नॅन्स केसांना पोषण देतात, त्यांची मुळे बळकट करतात आणि नैसर्गिकरित्या वाढवतात.

hair growth remedy|long hair solution | Dainik Gomantak

जेल

हे जेल तयार करण्यासाठी फक्त २ चमचे अळशीच्या बिया आणि २ कप पाणी घ्या. बिया पाण्यात उकळा, मिश्रण घट्ट झाल्यावर गाळा.

hair growth remedy|long hair solution | Dainik Gomantak

रोझमेरी इसेंशियल ऑइल

यात काही थेंब रोझमेरी इसेंशियल ऑइल घालून एक शक्तिवर्धक हेअर जेल तयार करता येतं.

hair growth remedy|long hair solution | Dainik Gomantak

चमकदार केस

हे जेल केसांच्या मुळांपासून टोकांपर्यंत लावून १ ते १.५ तास ठेवा आणि नंतर सौम्य शॅम्पूने धुवा. आठवड्यातून १-२ वेळा याचा वापर केल्यास केस मऊ, चमकदार, मजबूत होतात.

hair growth remedy|long hair solution | Dainik Gomantak

तुमच्या मुलांना किती पॉकेट-मनी देणं योग्य?

आणखीन बघा