Akshata Chhatre
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत केस गळती, कोरडेपणा आणि कोंड्याच्या समस्यांनी अनेकजण त्रस्त आहेत.
पार्लरमधील महागडे उपचार ही एक सोय नाही, आणि त्याचे रासायनिक दुष्परिणाम देखील टाळणं गरजेचं आहे.
म्हणूनच घरच्या घरी तयार केलेला नैसर्गिक हेअर मास्क ही एक उत्तम आणि सुरक्षित उपाययोजना आहे.
ताजं एलोवेरा जेल, दही, नारळ तेल. हे साहित्य तुमच्या केसांच्या लांबीनुसार घ्या.
टाळूवरील डेड स्किन दूर करतो, केस गळती कमी करतो, नवीन केस वाढवण्यास मदत करतो केसांना नैसर्गिक चमक देतो, कोंडा कमी करतो.
प्रोटीन आणि लॅक्टिक अॅसिडमुळे केसांना पोषण, कोरडेपणा आणि तुटणं कमी होतं टाळूचं आरोग्य सुधारतं, कोंड्यावर प्रभावी उपाय.
केसांच्या मुळांपासून पोषण, केस गळती आणि तुटणं कमी ओलावा टिकवतो, टाळू मजबूत आणि निरोगी ठेवतो.