Akshata Chhatre
घाम, सूर्यप्रकाश आणि प्रदूषणामुळे केस कोरडे होतात, तुटतात आणि गळायला लागतात.
यावर उपाय म्हणून महागड्या प्रॉडक्टऐवजी घरी तयार केलेलं औषधी नारळ तेल वापरा हा एक नैसर्गिक आणि प्रभावी पर्याय आहे.
२ टेबलस्पून आले पावडर, ४ टेबलस्पून खोबरेल तेल मिसळा आणि टाळूवर लावा, १० मिनिटांनी शॅम्पू करा.
१ कप नारळ तेल १ कांदा, ८-१० कढीपत्ता,१ चमचा मेथी एकत्र उकळा, थंड होऊ द्या आणि गाळून वापरा.
केस विभागा, मिश्रण टाळूवर लावा यानंतर हलका मसाज करा. ३०-६० मिनिटं ठेवा आणि नंतर धुवा
या तेलांमुळे केसांची वाढ वेगाने होते, कोंडा, खाज कमी होते. केस अधिक जाड, मजबूत आणि चमकदार होतात