Sameer Amunekar
आठवड्यातून किमान दोनदा खोबरेल तेल किंवा बदामाचे तेल कोमट करून टाळूला मसाज करा. यामुळे केसांच्या मुळांपर्यंत ओलावा पोहोचतो आणि कोरडेपणा कमी होतो.
दही नैसर्गिक कंडिशनरचे काम करते, तर मध ओलावा टिकवून ठेवतो. अर्धा कप दह्यात एक चमचा मध मिसळून केसांना लावा आणि ३० मिनिटांनंतर केस धुवा.
ताज्या कोरफडीचे जेल थेट केसांच्या टोकांना आणि मुळांना लावा. यात असलेली जीवनसत्त्वे केसांना हायड्रेट करतात आणि नैसर्गिक चमक देतात.
पिकलेले केळे मॅश करून त्यात थोडे ऑलिव्ह ऑईल मिसळा. हे मिश्रण केसांना लावल्याने केसांचा राठपणा जातो आणि केस मऊ होतात.
खूप गरम पाण्याने केस धुणे टाळा, कारण त्यामुळे केसांमधील नैसर्गिक तेल निघून जाते. नेहमी कोमट किंवा थंड पाण्यानेच केस धुवावेत.
ड्राय केसांसाठी सल्फेट-मुक्त (Sulphate-free) शॅम्पू वापरा. यामुळे केस स्वच्छ होतात पण कोरडे पडत नाहीत.
ओले केस खूप नाजूक असतात. केस थोडे वाळल्यानंतर मोठ्या दातांच्या लाकडी कंगव्याने हळुवार विंचरावे, जेणेकरून केस तुटणार नाहीत.