Hair Care: केस गळून डोकं दिसायची वेळ आली? वाचा 'हे' उपाय, केस होतील राजूसारखे लांब!

Akshata Chhatre

केस गळणे

आजच्या धावपळीच्या जीवनात ताणतणाव आणि चुकीच्या आहारपद्धतीमुळे केस गळणे ही एक सामान्य समस्या बनली आहे.

Hair care tips|Hair fall remedies | Dainik Gomantak

नैसर्गिक उपाय

बाजारातील केमिकल-युक्त उत्पादने ही समस्या आणखी वाढवतात. पण, योग्य काळजी आणि नैसर्गिक उपायांनी केस पुन्हा निरोगी आणि दाट बनवता येतात.

Hair care tips|Hair fall remedies | Dainik Gomantak

तेलाने मसाज

केसांना नियमित तेलाने मसाज करणे सर्वात महत्त्वाचे आहे. यासाठी तुम्ही नारळाच्या तेलामध्ये कढीपत्ता आणि जास्वंदाची फुले उकळून एक हर्बल तेल तयार करू शकता.

Hair care tips|Hair fall remedies | Dainik Gomantak

मुळांना मसाज

आठवड्यातून दोन ते तीन वेळा या तेलाने केसांच्या मुळांना मसाज करा. यामुळे डोक्यातील रक्ताभिसरण सुधारते, केसांची मुळे मजबूत होतात आणि गळती कमी होते.

Hair care tips|Hair fall remedies | Dainik Gomantak

प्रोटीन

केसांच्या वाढीसाठी आणि मजबुतीसाठी प्रोटीन हा अत्यावश्यक घटक आहे. मोड आलेली कडधान्ये, मेथीच्या बिया आणि दह्याचे मिश्रण करून बनवलेला प्रोटीन मास्क केसांना लावल्यास त्यांना खोलवर पोषण मिळते.

Hair care tips|Hair fall remedies | Dainik Gomantak

केसांची वाढ

हा मास्क अर्धा तास केसांवर ठेवा आणि नंतर धुवून टाका. हा उपाय केल्यास केसांची वाढ वेगवान होते आणि ते मऊ व दाट होतात.

Hair care tips|Hair fall remedies | Dainik Gomantak

तांदूळ आणि कढीपत्ता

आपल्या स्वयंपाकघरातील तांदूळ आणि कढीपत्ता देखील केसांसाठी उपयुक्त आहेत. तांदूळ रात्रभर पाण्यात भिजवून त्याचे पाणी केसांना लावल्यास ते मऊ, चमकदार आणि मजबूत होतात.

Hair care tips|Hair fall remedies | Dainik Gomantak

Being Single Benefits: सिंगल लोक असतात जास्त आनंदी, का ते जाणून घ्या?

आणखीन बघा