Akshata Chhatre
सध्या केस गळणे, केसांची मुळे कमजोर होणे आणि केस अकाली पांढरे होणे यांसारख्या समस्या खूप सामान्य झाल्या आहेत.
यामागे तणाव, प्रदूषण, अनहेल्दी आहार आणि केमिकल-युक्त उत्पादनांचा अतिवापर ही मुख्य कारणे आहेत.
या समस्यांवर मात करण्यासाठी एक सोपा, स्वस्त आणि प्रभावी उपाय आहे; चहाचे पाणी. होय, चहाचे पाणी केसांची मुळे मजबूत करण्यासोबतच केसांना दाट आणि चमकदार बनवते.
भांड्यात एक कप पाणी घ्या आणि त्यात १-२ टी बॅग्ज किंवा एक चमचा काळ्या चहाची पाने टाका.हे मिश्रण ५ ते ७ मिनिटे चांगले उकळवा. जेव्हा पाण्याचा रंग गडद होईल, तेव्हा गॅस बंद करा आणि पाणी पूर्णपणे थंड होऊ द्या. पाणी गाळून एका स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा.
चहाच्या पाण्याचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी ते योग्य पद्धतीने लावणे आवश्यक आहे. सर्वप्रथम केसांना तुमच्या नियमित शॅम्पूने स्वच्छ धुवा. हलक्या ओल्या केसांवर चहाचे पाणी स्प्रे करा किंवा बोटांच्या मदतीने केसांच्या मुळांवर लावा.
हे पाणी टाळूमध्ये चांगले मिसळले जावे यासाठी हलकी मालिश करा.हे केसांना कमीतकमी ३० मिनिटांसाठी तसेच राहू द्या. ३० मिनिटांनंतर तुम्ही साध्या पाण्याने केस धुऊ शकता किंवा लीव-इन टॉनिक म्हणून तसेच राहू देऊ शकता.
चहामध्ये असलेले कॅफीन आणि अँटिऑक्सिडंट्स टाळूला सक्रिय करतात, ज्यामुळे केसांची वाढ सुधारते आणि मुळे मजबूत होतात. नियमित वापराने केस गळण्याचे प्रमाण कमी होते आणि केस दाट दिसू लागतात.