दैनिक गोमन्तक
ताप, सर्दी आणि खोकल्यावर त्रास कमी करण्यासाठी गुळवेल रोमबाण उपाय आहे. गुळवेल काढा कसा बनवतात, हे पाहूयात.
एका भांड्यात पाणी उकळा आणि त्यात हळद, काळी मिरी,लवंग घालावे.
ते उकळल्यावर त्यात गूळ,तुळशीची पाने, गुलवेलीची पाने व खोडाचे 3 ते 4 तूकडे किसलेलं आलं आणि दालचिनी घालावे.
झाकण ठेवून मंद आचेवर 5 मीनिटं उकळू द्यावे.
नंतर पुदिन्याची पाने आणि जेष्ठ मध घाला. हे चांगले मिक्स करुन घ्या.
थंड झाल्यावर गाळून पिण्यासाठी घ्यावे.
डेंग्युच्या तापामध्ये शरीराच्या रक्तपेशी कमी होतात, यापासून बचावा करण्यासाठी गुळवेलचे सेवन फायदेशीर आहे.
आयुर्वेदामध्ये गुळवेलीली फार महत्व आहे.