Akshata Chhatre
सण असो, लग्न असो वा घरातला कोणताही आनंदाचा क्षण, गुलाब जामुन प्रत्येक प्रसंगी गोडवा आणण्याचे काम करतो.
पण तुम्ही कधी विचार केला आहे का की या मिठाईचे नाव गुलाब जामुन का पडले? कारण यात ना गुलाब असते, ना जामुन फळ.
विशेष म्हणजे, या मिठाईचा उगम थेट भारतात झाला नाही.
गुलाब जामुन या नावाचे मूळ फारसी भाषेत दडलेले आहे. फारसीमध्ये ‘गुल’ म्हणजे फूल आणि ‘आब’ म्हणजे पाणी. दोन्ही शब्दांचा अर्थ 'गुलाब जल' असा होतो.
ही मिठाई गुलाबजलच्या सुगंधित पाकात बुडवून दिली जाते, त्यामुळे तिला 'गुलाब' हे नाव मिळाले.
तळलेल्या खव्याच्या गोळ्यांचा रंग आणि आकार जामुन फळाशी मिळताजुळता असल्यामुळे, नावाचा दुसरा भाग 'जामुन' जोडला गेला.