Kavya Powar
मधुमेह हा असा आजार आहे ज्यावर कायमस्वरूपी इलाज नाही.
औषधे आणि योग्य आहारानेच मधुमेह नियंत्रणात ठेवता येतो.
याशिवाय काही नैसर्गिक पद्धतींनीही साखरेची पातळी नियंत्रित ठेवता येते.
पेरूची पाने रोज चघळल्याने मधुमेहापासून आराम मिळतो.
या पानांच्या सेवनाने रक्तातील साखरेची पातळी लवकर नियंत्रणात येते.
रात्री झोपण्यापूर्वी पेरूची पाने चघळल्याने रक्तातील साखरेची पातळी कायम राहते. हे पान केव्हाही चघळता येत असलं तरी रात्रीच्या वेळी जास्त फायदा होतो.
कारण रात्री जेवल्यानंतर ते रात्रभर शरीरातील अतिरिक्त साखरेवर काम करते आणि सकाळी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवते. ज्यांना रिकाम्या पोटी रक्तातील साखर वाढण्याची समस्या आहे त्यांच्यासाठी हे फायदेशीर ठरू शकते.