Akshata Chhatre
आजकाल लहान वयातच केस पांढरे होण्याची समस्या सामान्य झाली आहे, पण ही समस्या काही सोप्या घरगुती उपायांनी नैसर्गिकरित्या दूर करता येऊ शकते.
स्वयंपाकघरात सहज मिळणाऱ्या गोष्टी जसे की आवळा, मेथी, काळी कॉफी, भृंगराज आणि कढीपत्ता हे केसांसाठी अत्यंत उपयुक्त ठरतात.
आवळा अँटीऑक्सिडंट्सने भरलेला असून केस काळे करण्यात मदत करतो.
मेथीच्या दाण्यांतील पोटॅशियम आणि प्रथिने केसांना पोषण देतात.
काळ्या कॉफीचा टोनर केसांना नैसर्गिक काळसरपणा देतो; भृंगराज आणि खोबरेल तेल यांचा मास्क केसांचा नैसर्गिक रंग राखतो आणि त्यांची वाढ सुधारतो.
कढीपत्त्यातील जीवनसत्त्वे आणि खनिजे टाळूला पोषण देऊन केसांची चमक वाढवतात.
हे सर्व उपाय आठवड्यातून २-३ वेळा नियमित केल्यास पांढऱ्या केसांची समस्या कमी होऊन केस पुन्हा काळे, दाट आणि चमकदार होऊ शकतात.