Akshata Chhatre
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत आरोग्यदायी आहार पाळणे जरी कठीण असले, तरी केस आणि त्वचेच्या आरोग्यासाठी नैसर्गिक उपाय सहज मिळू शकतात.
ग्रीन टी हा त्यापैकी एक महत्त्वाचा उपाय आहे. वजन कमी करण्यासाठी ओळखली जाणारी ही चहा पत्ती केसांच्या आरोग्यासाठीही वरदान ठरते.
ग्रीन टीमधील अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे केसांना आतून पोषण देतात, मुळांना बळकटी देतात आणि अकाली केस गळतीवर नियंत्रण ठेवतात.
नियमित ग्रीन टीचे सेवन केल्याने रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे केसांच्या मुळांपर्यंत आवश्यक पोषण पोहोचते आणि केस निरोगी राहतात.केवळ प्यायल्यानेच नव्हे, तर ग्रीन टीचा बाहेरूनही उपयोग केला तर तो अधिक प्रभावी ठरतो.
केवळ प्यायल्यानेच नव्हे, तर ग्रीन टीचा बाहेरूनही उपयोग केला तर तो अधिक प्रभावी ठरतो.
शॅम्पूनंतर ग्रीन टी रिंस केल्याने केस मऊसर, गुळगुळीत आणि चमकदार होतात.
यामुळे केसांतील ड्रायनेस कमी होतो आणि निस्तेजपणा दूर होतो.