Kavya Powar
हिवाळ्यात कांद्याची पात खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
कांद्याच्या पातीमध्ये असे अनेक गुणधर्म आणि पोषक तत्वे आढळतात जे हिवाळ्यात विशेषतः फायदेशीर मानले जातात.
सर्दी आणि खोकल्यामध्ये फायदेशीर : कांद्याच्या पातीमध्ये व्हिटॅमिन सी, अँटिऑक्सिडंट्स, फायबर आणि अनेक खनिज मुबलक प्रमाणात आढळतात.
रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत: हिरव्या कांद्यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी-6, फोलेट, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम यांसारखे अनेक पोषक घटक आढळतात जे रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करतात.
हाडांसाठी फायदेशीर: कांद्याच्या पातीमध्ये असे अनेक पोषक घटक आढळतात जे हिवाळ्यात हाडे आणि सांधेदुखीपासून आराम मिळवून देण्यास मदत करतात.
पचनसंस्था निरोगी राहते: यामध्ये जास्त प्रमाणात पाणी आणि फायबर असते, जे पचनसंस्थेसाठी खूप फायदेशीर असते.
हृदयासाठी फायदेशीर : कांद्याच्या पातीमध्ये मुबलक प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात. ज्यामुळे अनेक आजार होतात.