'गूगल'चा 25 वा बर्थडे; जाणून घ्या इंटरेस्टिंग गोष्टी...

गोमंतक ऑनलाईन टीम

गूगलर्सना धन्यवाद

गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, हॅपी 25 बर्थडे गूगल! आमची प्रॉडक्ट वापरणाऱ्या आणि आम्हाला इनोव्हेशनसाठी नेहमी चॅलेंज करत राहणाऱ्या गुगलर्सना धन्यवाद.

sundar pichai | google image

स्थापना

Google ची स्थापना 4 सप्टेंबर 1998 रोजी झाली होती, परंतु 2005 साली जेव्हा Google Inc. अधिकृतपणे लाँच करण्यात आले तेव्हापासून कंपनीने 27 सप्टेंबर रोजी वर्धापन दिन साजरा करण्यास सुरुवात केली.

google | google image

आधीचे नाव

अधिकृत लॉन्च होण्यापूर्वी, त्याचे नाव बॅकरब होते जे नंतर Google केले गेले.

google | google image

संस्थापक

सर्गेई ब्रिन आणि लॅरी पेज या स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या डॉक्टरेटच्या दोन विद्यार्थ्यांनी संयुक्तपणे हे सर्च इंजिन तयार केले आहे. गुगलने ब्लॉग पोस्टमध्ये त्यांची आठवण काढली आहे.

google | google image

डूडल

2000 सालापर्यंत डूडल कंत्राटी पद्धतीने बनवले जात होते. यानंतर एक टीम डूडलसाठी काम करू लागली, ज्यांना डूडलर्स म्हणतात. अमेरिकेचे रायन गार्मिक हे गुगलचे मुख्य डूडलर आहेत.

google | google image

डुडलर्स टीम

रेखाचित्रे बनवणाऱ्या लोकांची एक टीम त्यांच्यासोबत काम करते, ज्यामध्ये डझनहून अधिक लोकांचा समावेश आहे.

google | google image

भारतासाठी पहिले डूडल

गुगलने 2009 मध्ये भारतासाठी पहिली 'डूडल फॉर गुगल कॉन्टेस्ट' जाहीर केली आणि विजयी डूडल 14 नोव्हेंबर 2009 रोजी गुगल इंडियाच्या होमपेजवर लाइव्ह करण्यात आले.

google | google image
hritik and saba | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी...