Pramod Yadav
पणजीपासून काही अंतरावर असलेल्या पर्वरी येथे गोमंतक मराठी अकादमीच्या वतीने 2008 साली मराठी भवन उभारण्यात आले आहे.
मराठी भवनात प्रवेश करताच येथील भव्य सभागृह पाहायला मिळते.
या सभागृहाला स्व. शशिकांत दत्ता नार्वेकर यांचे नाव देण्यात आले आहे.
सभागृहात बैठकीसाठी उतरत्या पायऱ्यांची सुरेख बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व ठिकाणावरून सभागृहाचे व्यासपीठ स्पष्ट दिसते.
मराठी भवनात श्रीमती ताराबाई राजाराम बांदेकर यांच्या नावाने सुसज्ज ग्रंथालय आहे.
या ग्रंथालयात सुमारे 5,000 पुस्तके असल्याची माहिती येथे कार्यरत कामगारांनी दिली आहे.
ग्रंथालय सर्वांसाठी खुले असते, याचे सदस्यत्व घेऊन येथील उपलब्ध पुस्तके वाचता येतील असे येथील कर्मचाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, मराठी भवनाची काही प्रमाणात दुरावस्था झाली असून, ही वास्तू उद्धाराच्या प्रतीक्षेत आहे.