Akshay Nirmale
तांबडीसुर्ला-साकोर्डात हिरव्यागार वनराईमधील गोव्यातील जगप्रसिद्ध महादेव मंदिर आहे. तांबडी सुर्लातील महादेव मंदिर म्हणून याची ओळख आहे.
गोव्याच्या धारबांदोडा तालुक्यातील तांबडीसुर्ला-साकोर्डा येथील श्री महादेव मंदिर हे जागतिक वारसा स्थळ म्हणून जगप्रसिद्ध आहे.
या मंदिराला भेट देण्यासाठी देश-विदेशातून पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. सुट्टीच्या दिवसांत येथे पर्यटकांची गर्दी उसळते.
पावसाळ्यात निसर्गाचा मनसोक्त आनंद लुटण्यासाठी पावसाळी पर्यटकांची संख्या लक्षणीय असत
हे शिव मंदिर सह्याद्री पर्वतांच्या हिरव्यागार वनराईच्या सान्निध्यात वसलेले असल्याने मंदिराच्या सौंदर्यात कमालीची भर पडलेली आहे.
शिवाय मंदिराच्या सभोवताली आकर्षक बागेची रचना केल्यामुळे आणि निसर्गाचा वरदहस्त लाभल्यामुळे पावसाळ्यात पर्यटक मोठ्या प्रमाणात येथे येतात.
याच भागात तांबडी सुर्ला धबधबा देखील आहे. वर्षा पर्यटनावेळी पर्यटक या मंदिरासह या धबधब्यालाही भेट देतात.