Pramod Yadav
गोव्यातील दिवाडी बेटावर मिनी कार्निव्हल साजरा होत आहे.
हा कार्निव्हल पोतेकर म्हणून प्रसिद्ध आहे.
पणजीतील कार्निव्हल झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवसापासून दिवाडी बेटावर पोतेकार उत्सव साजरा केला जातो.
या उत्सव काळात स्थानिक नागरिक वेगवेगळी वेशभूषा करतात.
कार्निव्हल पाहण्यासाठी राज्यासह विदेशातील नागरिक आणि पर्यटक भेट देतात.
दिवाडी बेटावर तीन दिवस हे मिनी कार्निव्हल असते.
स्थानिकांनी केलेल्या विविध वेशभूषा अधिक आकर्षक आणि विचित्र प्रकारच्या असतात.
वेशभूषा करून स्थानिक नागरिक रस्त्यावर फिरतात.