'शेणी उझो'... आगीशी खेळ नव्हे उत्सव!

Pramod Yadav

गोव्यातील केपे पासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या मळकर्णे गावात ही अनोखी होळी खेळली जाते.

Sheni Uzzo | Rohan Fernandes

गावचे युवक होळीच्या रात्री मल्लिकार्जुनाच्या देवळासमोर एकत्र येतात. 

Sheni Uzzo | Rohan Fernandes

या होळीच्या माडीवर तरुण वर चढू लागतात आणि खाली असलेले भाविक त्यांच्यावर पेटलेली शेणी फेकून मारतात.

Sheni Uzzo | Rohan Fernandes

शेणी म्हणजे शेणाची सुकी गोवरी. ही पेटलेली शेणी अंगावर फेकली की गावातील इडा पीडा दूर होते आणि रोगराई टळते असा समज आहे.

Sheni Uzzo | Rohan Fernandes

या उत्सवात भाग घेणारे सात दिवस व्रतस्थ राहतात. व्रतस्थ राहतात त्यांनाच या उत्सवात भाग घेता येतो.

Sheni Uzzo | Rohan Fernandes

माडीवर चढलेल्या गाड्यावर जेव्हा पेटती शेणी फेकली जाते, तेव्हा ती त्याच्यावर आपटून आगीच्या ठिणग्या सर्वत्र पसरतात.

Sheni Uzzo | Rohan Fernandes

खाली आंब्याचे ताळे घेऊन नाचणाऱ्यावरही या ठिणग्या पडतात. देवाचाच हा प्रसाद समजून आपल्यावर झालेली ती कृपा समजतात.

Sheni Uzzo | Rohan Fernandes

शेकडो वर्षापासून मळकर्णे गावात ही आगळी वेगळी होळी साजरी केली जाते.

Sheni Uzzo | Rohan Fernandes
richest person 2023 | Dainik Gomantak