Kavya Powar
भारतीय अवकाशवीरांना घेऊन गननयान जेव्हा चंद्राकडे झेपावेल, तेव्हा गोमंतकीयांचा उर भरून येण्यासाठी निश्चितपणे एक कारण असेल.
गगनयानात वापरला गेलेला ऑर्बिटर मोड्युल ॲडाप्टर हा गोव्यात तयार केलेला आहे.
पिळर्ण येथील कायनेको कमान कंपनीत तयार झालेल्या या ॲडाप्टरला आज कंपनीत झालेल्या एका कार्यक्रमात विक्रम साराभाई अवकाश संशोधन केंद्रातील वरिष्ठ अधिकारी विनू विश्वनाथन यांनी झेंडा दाखवला.
लवकरच हा सुटा भाग विशाखापट्टणम येथील भारतीय अवकाश संशोधन केंद्रात (इस्रो) रवाना करण्यात येणार आहे.
गगनयानात वापरला गेलेला महत्त्वाचा भाग गोव्यात तयार झाला ही गोमंतकीयांसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे.
अशी महत्वाची संधी राज्याला वारंवार मिळत राहो, अशी आशा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली
सांघिक कामामुळे हे यश शक्य झाले आहे. इस्त्रोसारख्या संस्थेने कंपनीवर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवला, असे शेखर सरदेसाई म्हणाले