गोमन्तक डिजिटल टीम
गोव्याची खरी मजा इथल्या गावांमध्ये आहे. बाहेरून पर्यटनाचं आकर्षण आणि बॉलीवूडमध्ये दाखवलेला गोवा तिथल्या गावांमध्ये गेल्यानंतर एकदम वेगळाच वाटतो.
शांत जागा, थंड बागायती, वाहणारा झरा आणि पक्षांचे आवाज गोव्यातील गावांची खासियत आहे.
इथलं वातावरण जरी दमटीचं असला तरीही आजूबाजूची शांतता मनाला थंडावा देते.
गोव्यातल्या गावांची विशेषता म्हणजे इथली घरं तुम्हाला कधीही बंद दिसणार नाही. इथे तुम्ही कोणत्याही वेळी भेट द्या तुमचं आनंदाने स्वागत केलं जातं.
गावागावांमध्ये असलेलं देवळं, गाईचं हंबरण, कोंबड्याचं आरावण हे सगळं गोव्यातील गावांचं सौंदर्य वाढवतं.
अधूनमधून येणारी एखादी गाडी आणि निव्वळ शांतता आजही इथे अनुभवायला मिळते.
मग तुम्ही इथे दिलखुलास हसा किंवा सायकल घेऊन फिरा आयुष्याचा खरा आनंद हा गावांमध्येच आहे.