Akshay Nirmale
बॉक्सिंग आयटीओ बनणाऱ्या त्या देशातील पहिल्याच महिला आहेत.
आयटीओ परीक्षा थायलंडमधील बँकॉक येथे झाली होती. त्यात जगभरातील 24 जण सहभागी झाले होते.
भारतीय बॉक्सिंग महासंघातर्फे चार जण या परिक्षेत सहभागी झाले होते. दानुष्का यांनी आवश्यक सर्व निकष पूर्ण करत परिक्षेत उत्तीर्ण झाल्या.
आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघातर्फे 13 फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर करण्यात आला.
दानुष्कासह जगभरातून फक्त सहा जण ही प्रतिष्ठेची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.
दानुष्का या गोव्याच्या माजी महिला बॉक्सर आहेत. तसेच त्या पत्रकारही आहेत.
भारतीय बॉक्सिंग महासंघाच्या संयुक्त सचिव असून गोवा हौशी बॉक्सिंग संघटनेच्या कार्यकारिणी सदस्य आहेत.