Akshata Chhatre
गोवा हे केवळ सुंदर किनारे आणि व्हायब्रंट नाईटलाईफसाठीच नाही. तर आपल्या समृद्ध वारसा, चित्तथरारक नैसर्गिक देखावे आणि चवदार खाद्यसंस्कृतीमुळेही जगभर प्रसिद्ध आहे.
जर तुम्ही अजूनही गोवा ट्रिपचा प्लान केला नसेल, तर एकदा तरी मित्रांसोबत तो नक्की करा.
गोवा भेटीचा सर्वोत्तम काळ ऑक्टोबर ते मार्च हा आहे, कारण या काळात हवामान आणि थंड असते.
येथे वॉटर स्पोर्ट्सचा आणि बीच शॅक्सवर पार्टीचा आनंद लुटा. सीफूड नक्की ट्राय करा.
पोर्तुगीज इतिहासाची झलक दाखवणारे बेसिलिका ऑफ बोम जीसस आणि सेंट कॅथेड्रल चर्च पाहायला विसरू नका.
ट्रेकिंग किंवा जीप सफारीद्वारे या भव्य धबधब्याचे सौंदर्य अनुभवू शकता. १७ व्या शतकातला आग्वाद किल्ला अरब समुद्राचे मनोरम दृश्य देतो. लाईटहाऊस फोटोग्राफीसाठी उत्तम आहे.
फिरण्यासाठी बाईक किंवा स्कूटर भाड्याने घेणे सोयीचे आहे. फिश करी राईस आणि पोर्क विंडालू सारखे स्थानिक पदार्थ नक्की चाखा. सुरक्षेसाठी, लाईफगार्डने चिन्हांकित केलेल्या सुरक्षित ठिकाणीच पोहो.