Vinayak Samant
संकेत मांद्रेकर हा मेकॅनिकल इंजिनीयरिंग केलेला तरुण मांद्रे गावात रहातो. गेली सहा वर्षे तो पर्यावरणपूरक मूर्ती घडवितोय.
इंजिनीयरिंग केलेल असूनही आपली आवड जपत व्यवसायाला सुरवात केली. त्यातच पर्यावरणपूरक गणेशमूर्ती करण्याचे त्याला सुचले.
प्लास्टर ऑफ पॅरिस च्या गणेशमूर्तींची विसर्जनावेळी होणारी विटंबना पाहून दरवर्षी एकही रासायनिक रंग न वापरता पूर्णपणे चिकण मातीची मूर्ती बनविण्याचा त्याने ध्यास घेतला.
घरात वापरले जाणारे कडधान्य, गहू, तांदूळ, लाकडाचा भुसा अशाप्रकारच्या वस्तु वापरुन पहिल्यांदा स्वतःच्या घरातील गणपती संकेतने बनविला.
आपल्या घरातील गणेशमूर्ती पाहून इतरांनी देखील पर्यावरणपूरक गणपती घरात पूजेसाठी आणावा हा त्याचा निव्वळ हेतु आहे.
संकेत ने बनविलेली अनोखी आणि सुंदर गणेशमूर्ती पाहून आजूबाजूच्या लोकांनी देखील त्याला आपल्यासाठी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनविण्याची विनंती केली.
सहा वर्षांपूर्वी एक गणेशमूर्तीपासून सुरु केलेले हे पर्यावरण रक्षणाचे अभियान आज १६ मूर्तीपर्यन्त पोहोचले आहे.