Ganeshprasad Gogate
आषाढी एकादशीला गोवा आणि महाराष्ट्रभरातून जवळपास शेकडो दिंड्या, पालख्या पंढरपूरला जातात.
हरिमय झालेले असंख्य वारकरी कित्येक किलोमीटर चालत पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होतात.
गोव्यात वाळपई, साखळी, केरी या भागात आषाढी एकादशी उत्साहाने साजरी करण्यात आली.
अनेक शाळांमधून छोट्या मुलांना संतांची वेषभूशा करून दिंडी काढण्यात आली होती.
काही ठिकाणी महिला वर्गाने एकसमान वेशभूषा करून विठ्ठलाचा नामघोष करत फुगड्या घातल्या.
वाळपई येथे डाॅ. के.बे. हेडगेवार शाळेतर्फे एकादशी साजरी करण्यात आली. यावेळी मुलांना विठ्ठल रखुमाईची वेशभूषा करण्यात आली होती.
केरी येथे बालचमू आणि त्यांच्या पालकांनी एकत्र येत पारंपारिक वेशभूषा करत दिंडी काढली होती.