Kavya Powar
२७ जुलैपासून आजअखेर गोव्यात केवळ चार दिवस वगळता इतर दिवशी पावसाची गैरहजेरीच आहे.
तरीही पूर्वी पडलेल्या पावसाच्या आधारे पश्चिम घाटातील जंगले, खाजगी वने आणि राखीव माळराने हिरवीगार दिसत आहेत
त्यामुळे यंदाच्या फुलोत्सवाला सुरुवात झाली आहे
प्रत्येक फुलाचा रंग, रूप, गंध, आकार, रचना आणि वैशिष्ट्य निराळे असते
काही रात्री फुलतात, तर काही दिवसा. काही सुवासिक तर... काही वास नसलेली
पावसाळ्याच्या अखेरीस श्रावण- भाद्रपद महिन्यात येथील पर्वत पठारांवर, डोंगरमाथ्यावर उतारावर, कुठे खडकात फुललेल्या रानफुलांच्या रूपाने रंगांची उधळण सुरू असते.
तुम्ही जर या काळात गोव्यात याल तर सुंदर फुलांचे नयनरम्य दृश्य तुम्हाला नक्की पाहायला मिळेल.