Akshata Chhatre
राज्यात सध्या पावसाचा तडाखा सुरु आहे. हवामान खात्याकडून गोव्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलाय.
उत्तर तसेच दक्षिण गोव्यात सुरु असलेला पाऊस मोठं नुकसान करतोय. अनकेनच्या घरांमध्ये पाणी साचलं असून मोठ-मोठी झाडं कोलमडून पडली आहेत.
कुडचडे येथील नंदा तळ्याच्या बंधाऱ्याची दारे उघडल्याने माड-बाणसाय येथील शेतीत मोठ्या प्रमाणात पाणी गेल्याने सुमारे पन्नास शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
भातशेती कापणीच्या तोंडावर येऊनही शेतकऱ्यांना या अवकाळी पावसामुळे मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.
मुसळधार पावसाने आठ तालुक्यांना पुराने वेढले, शेकडो संसार पाण्याखाली गेले, कित्येक गावांचा संपर्क तुटला, तीन तालुक्यांत पाणीटंचाई उद्भवली, लोकांच्या डोळ्यांत आसवे दाटली.
म्हापशात कधी नव्हे इतके नुकसान मान्सूनपूर्व पावसात झाले आहे. घरादारांत पाणी शिरले. लोकांमध्ये प्रचंड खदखद आहे.