Akshay Nirmale
गेल्या 14 महिन्यात पिंक फोर्स पथकाला 3447 कॉल्स आले. ही सर्व प्रकरणे निकालात काढली आहेत.
या एकूण कॉल्सपैकी पणजीतून 1029, मडगाव 603, पेडणे 442, डिचोली 356 आणि म्हापसा 343 कॉल्स आले.
चालकांअभावी पिंक फोर्सची 10 पैकी निम्मी वाहने बंद ठेवण्याची वेळ येते.
पिंक फोर्ससाठी 90 पोलिस कर्मचाऱ्यांची नियुक्त केली असून त्यापैकी 60 महिला आहेत. उर्वरीत चालक आहेत.
प्रत्येक तालुक्यात पिंक फोर्स असून प्रत्येक उपविभागीय पोलिस कार्यालयात एक वाहन आहे. वाहनात दोन महिला एक चालक असतो.
ही सेवा सकाळी 9 ते रात्री 9 आणि रात्री ९ ते सकाळी 9 अशा दोन शिफ्टमध्ये चालते.
मदतीसाठी काही टोल फ्री क्रमांक दिले गेले आहेत. या ज्येष्ठ नागरिकांसाठी १०९०, पोलिस नियंत्रण कक्ष ११२, महिला हेल्पलाईन १०९१ या क्रमांकांवर संपर्क साधता येऊ शकतो.