Akshata Chhatre
गोव्याचा पावसाळा, डोंगरदऱ्या आणि कच्चे रस्ते म्हणजे ऑफ-रोडिंगसाठी परफेक्ट वेळ आणि ठिकाण.
पावसात चिखल, खडी आणि निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी दरवर्षी गोव्यात ‘मोटो ट्रिप’ नावाचा खास इव्हेंट घेतला जातो.
यंदाची ‘ट्रेल टाइम’ राइड म्हापसा विमानतळापासून सुमारे १५ किमी अंतरावर झाली आणि त्या ट्रेलवर निसर्गदृश्य खूपच सुंदर आणि रोमांचक होते.
या प्रकारच्या ऑफ-रोडिंगमध्ये थोडा धोका असतोच, म्हणून मोठ्या इव्हेंटमध्ये अॅम्ब्युलन्ससारखी वैद्यकीय मदत ठेवलेली असते. पण लहान ग्रुप राइड्समध्ये ती नसते, त्यामुळे स्वतःसोबत मेडिकल किट ठेवणे खूप गरजेचे आहे.
यंदाच्या इव्हेंटमध्ये एक विशेष गोष्ट म्हणजे महिला रायडर्सनी देखील भाग घेतला.
गोव्यात ऑफ-रोडिंगसाठी अनेक सुंदर ट्रेल्स आहेत.डोंगरातले लहान रस्ते, जंगलातून जाणाऱ्या वाटा, खडी-वळणाचे चढउतार यामुळे ही राइड फारच मजेशीर आणि थोडी थरारक असते.
अशा राइड्समध्ये ग्रुपसोबत चालणं नेहमीच चांगलं कारण ते सुरक्षित असतं, एकमेकांची मदत होते आणि साहस अजूनच मजेदार होतं.