Pramod Yadav
गोव्यातील नाईट लाईफ
गोव्यातील नाईट लाईफ आणि नाईट शॉपिंगचे आकर्षण प्रत्येकालाच असते.
गोव्यातील नाईट मार्केट
गोव्यात फिरण्यासह शॉपिंग करण्याची प्रत्येकालाच आवड असते. त्याच गोव्यातील अशी प्रसिद्ध ठिकाणी आहेत जिथे तुम्ही नाईट शॉपिंग करू शकता.
हडफडे येथील शनिवार रात्र बाजार
हडफडे येथील शनिवार रात्र बाजारात तुम्हाला सर्व प्रकारचे अॅक्सेसरिज मिळतील, हा बाजार सायंकाळी चार ते पहाटे तीन वाजेपर्यंत खुला असतो.
आश्वे येथील बीच मार्केट
आश्वे येथील समुद्रकिनारी असणारे हे मार्केट भारतातील एक लग्झरी मार्केट म्हणून ओळखले जाते. विशेष म्हणजे सर्व सीझन्समध्ये ते खुले असते.
हणजूणे येथील बाजार
हणजूणे येथील समुद्रकिनारी असणारे मार्केट दर बुधवारी सकाळी नऊ ते सायंकाळी सातपर्यंत खुले असते.
मॅकी नाईट बाजार, बागा
बागा येथील मॅकी नाईट बाजार सकाळी ते रात्री 12 पर्यंत खुले असते. याठिकाणी खाद्यपदार्थ, संगीत आणि बिअर शॉप, कपडे यासारख्या गोष्टी पाहायला मिळतात.
हरमल येथील बीच मार्केट
हरमल येथील बीच मार्केट देखील सकाळी दहा ते रात्री नऊ या वेळेत खुले असते. याठिकाणी मसाले, कपडे, ज्वेलरी यासारख्या वस्तू खरेदी करायला मिळतात.