Ganeshprasad Gogate
आज गोव्यासह महाराष्ट्र आणि लगतच्या गुजरात किनारपट्टीवर नारळी पौर्णिमा हा सण उत्साहात पार पडला.
गोव्याचे मत्स्योद्योगमंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी नारळी पौर्णिमेनिमित्त मांडवी नदीला श्रीफळ अर्पण केले.
आजच्या दिवशी कोळी बांधव समुद्र देवतेची मनोभावे पूजा करून समुद्राला नारळ म्हणजेच श्रीफळ अर्पण करतात आणि मान्सूनच्या सुरुवातीला थांबवलेला मच्छीमारी व्यवसायाला सुरु करतात.
शुभ कार्याची सुरुवात नारळ वाढवून आणि इष्ट देवतेला नारळ अर्पण करून केली जाते. कारण नारळ हे फळ शुभसूचक असून सर्जनशक्तीचेही प्रतीक मानले गेले आहे.
म्हणूनच कोळीबांधव समुद्रातून भरपूर मासे मिळावेत आणि आपला व्यवसाय वृद्धिंगत व्हावा यासाठी समुद्राला नारळ अर्पण करतात.
यासोबतच समुद्रातील मच्छीमारीसाठी प्रवास करत असताना कोणतीही दुर्घटना घडू नये आणि समुद्ररूपी ईश्वराने आपले रक्षण करावे यासाठी मच्छीमार प्रार्थना करतात.