Goa Monsson Session...म्हणून गाजले पावसाळी अधिवेशन

Shreya Dewalkar

अपुरा अभ्यास

अपुरा अभ्यास, विधिमंडळ कामकाजाचे तोकडे ज्ञान व लोकप्रतिनिधी म्हणून आपली जबाबदारी ओळखण्यातच आमदार कमी पडल्याचे दुर्दैवी चित्र गोवा विधानसभेच्या अठरा दिवसीय अधिवेशनात समोर आले.

Goa assembly monsoon session 2023 | Dainik Gomantak

अठरा दिवसांचा मागोवा घेता

एकंदर अठरा दिवसांचा मागोवा घेता सत्ताधारी व विरोधी अशा दोन्ही बाजू लंगड्याच असल्याचे दिसले. विधानसभा कामकाजातही प्रसंगी नियम बदलून सुधारणा घडविणे गरजेचे असल्याचे या अधिवेशनातून समोर आले.

Goa Assembly Monsoon Session 2023 | Dainik Gomantak

अधिवेशनाचे महत्त्व

एकंदर अठरा दिवसांचे कामकाज पाहता सरकार व विरोधकांना अधिवेशनाचे महत्त्वच कळले नसल्याचे स्पष्ट दिसत होते.

Goa Assembly Monsoon Session 2023 | Dainik Gomantak

पावसाळी अधिवेशन

केवळ एक सोपस्कार म्हणून प्रश्न विचारायचे, मुद्दा सोडून भलतेच बोलायचे, असे प्रकार आता नेहमीचेच झाले आहेत. तारांकित व अतारांकित प्रश्नांना दिलेली लेखी उत्तरे पाहिल्यास प्रशासन पूर्णपणे कोलमडल्याचेच स्पष्टपणे दिसत आहे.

Goa Assembly Monsoon Session 2023 | Dainik Gomantak

पावसाळी अधिवेशन

आमदारांनी प्रश्न विचारताना नीट अभ्यास करणे जरूरीचे असून, अधिकारी व मंत्र्यांनीही समर्पक माहिती देणे गरजेचे आहे. अवघ्या एक-दोन आमदारांनीच आपले प्रश्न खोलवर माहिती मिळविण्यासाठी नीट अभ्यास करून विचारल्याचे दिसते.

Goa Assembly Monsoon Session 2023 | Dainik Gomantak

वनमंत्र्यांची अतिघाई

वनमंत्री विश्वजीत राणे यांच्या अतिघाई स्वभावाने त्यांचेच शब्द मागे घेण्याची वेळ त्यांच्यावर आली. वीजमंत्री सुदिन ढवळीकर मात्र ज्या बाजूला असतात तेथे खाल्ल्या मिठाला जागतात.

Goa assembly monsoon session 2023 | Dainik Gomantak

लोबोंचा सरकारला घरचा अहेर

सत्ताधारी गटातील डॉ. दिव्या राणे व डॉ. चंद्रकांत शेट्ये हे आपले विषय मांडताना खूपच प्रभावी ठरले. आमदार मायकल लोबो यांनी सरकारला घरचा अहेर देण्याची एकही संधी सोडली नाही.

Michael Lobo | Dainik Gomantak

फेरेरा बनले सल्लागार

काँग्रेसचे आमदार कार्लुस फेरेरा यांची वागणूक सरकारला सल्ला देण्याचीच होती. विविध विषयांवरून त्‍यांनी सरकारला धारेवर धरण्‍याचा प्रयत्‍न केला आणि त्‍यात ते यशस्‍वीही ठरले.

Goa assembly monsoon session 2023 | Dainik Gomantak

सरदेसाई वरचढच!

गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांची कामगिरी अपेक्षेप्रमाणे उत्तमच होती. शून्य काल, लक्षवेधी सूचना मांडताना त्यांनी संपूर्ण राज्याचे प्रश्न मांडले.

Goa assembly monsoon session 2023 | Dainik Gomantak

युरींचा प्रभाव कमी

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांची प्रतिमा सुरवातीच्या चार अधिवेशनांत एक अभ्यासू आमदार म्हणून पुढे आली होती. परंतु या अधिवेशनात ते खूपच कमी पडल्याचे जाणवले.

Goa assembly monsoon session 2023 | Dainik Gomantak

‘आप’, ‘आरजी’चे आमदार निष्प्रभ

‘आप’चे दोन आमदार या अधिवेशनात खास प्रभाव दाखवू शकले नाहीत. कॅप्टन व्हेंझी व्हिएगस व क्रुझ सिल्वा यांनी अठरा दिवसांचे कामकाज हाताळण्यासाठी अधिक अभ्यास करणे गरजेचे होते.

Goa assembly monsoon session 2023 | Dainik Gomantak
येथे क्लिक करा...