Akshata Chhatre
गणेशोत्सवाला अवघे काही दिवस बाकी आहेत आणि गोव्याच्या बाजारपेठा आधीच उत्साहात रंगल्या आहेत.
रंगीबेरंगी सजावट, फुलांचे गुच्छ, भिंतींवर लटकणारे आकर्षक वॉल हॅंगिंग्ज, चमकदार पडदे आणि विविध प्रकारचे देखणे मखर हे सगळं पाहून बाजारपेठा एकदम सणासुदीच्या रुपात दिसत आहेत.
हॅण्डमेड आणि रेडिमेड अशा दोन्ही प्रकारच्या वस्तू खरेदीसाठी उपलब्ध आहेत.
सुंदर कोरीव काम केलेली मखरं ही प्रत्येक घरातील बाप्पाच्या सजावटीसाठी आवश्यक ठरतात.
मणी, मोती आणि कृत्रिम फुलांनी बनवलेली वॉल हॅंगिंग्ज लक्ष वेधून घेतात. तसेच
याशिवाय बाजारात रंगीत कापडी पगड्या देखील मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. चमचमीत रंगछटा, अर्ध-मौल्यवान दगड आणि मण्यांनी सजवलेल्या या पगड्या बाप्पाच्या रुपाला अधिक आकर्षक बनवतात.
या वर्षीच्या गणेशोत्सवासाठी कोणतंही थीम ठरवलं असेल, तर गोव्यातील बाजारपेठा आणि स्थानिक दुकाने याठिकाणी तुम्हाला तुमच्या कल्पनेला साजेशी सजावटीची वस्तू नक्की मिळेल.