Manish Jadhav
गोव्याला समृद्ध करणारी निसर्ग राजी पाहिल्यानंतर पर्यटक सुखावून जातात.
आज (22 नोव्हेंबर) आपण या वेबस्टोरीच्या माध्यमातून गोवन लाईफबाबत जाणून घेणारोत.
'साधी राहणी आणि उच्च विचारसरणी' या म्हणीप्रमाणे गोव्यातील लोक आपले दैनंदिन जीवन जगतात.
गोव्याचा जसा विकास झाला तसा गोमंतकीयांच्या राहणीमानाचा दर्जाही उंचावला. शहरी भागात खासकरुन राजधानीत (पणजी) गोमंतकीयांची लाईफस्टाईल उंचावली.
गोव्यातील ग्रामीण जीवन अनुभवण्यासाठी पर्यटक दरवर्षी मोठ्यासंख्येने येतात. नारळी-पोफळीच्या बागा, उंच कौलारु घरे, भात शेती सर्व काही मोहीनी घालणारं आहे.
गोव्याला येणारा पर्यटक इथल्या गोवन मसाल्यांमधील खाद्यपदार्थांची नक्की चव चाखतो. तुम्हीही आवर्जुन गोव्यात आल्यानंतर गोवन खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला पाहिजे.