गोमन्तक डिजिटल टीम
परिकथेमध्ये ठरवल्याप्रमाणे आपण जीवन जगण्याचे ठरवतो पण खरंतर अगदी त्याचप्रमाणे सर्वकाही घडत नसतं. पण गोव्यामध्ये जाणं म्हणजे थोड्यावेळासाठी धकाधकीच्या जीवनातून घेतलेला आराम.. कसे ते पाहू....
वाढत्या पावसात एका चालत्या वाहनाच्या खिडकीतून बाहेर पाहिल्यावर आपल्याला चित्रपटातील मुख्य पात्र असल्यासारखं भासवतो, जो एक रोमॅंटिक अनुभव देतो.
समुद्री लाटांशी स्पर्धा करणे, समुद्रासोबत 'कॅच आणि कुक' खेळणे हे एक विशेष अनुभव आहे.
जिभेवरून मनापर्यंत रेंगाळणाऱ्या गोव्यातील खाद्य पदार्थांचा आस्वाद घेणे म्हणजे निर्विवाद आनंदाचा भाग आहे.
स्वतःच्या चिंतनात हरवून जाऊन ध्यान करणे म्हणजेच दुःख आणि अपूर्ण भावनांचा समोपचार घेण्याचा एक चांगला उपाय आहे.
कोणत्याही गोष्टीचा शेवट किती वेदना देणारा असतो हे आपल्याला गोव्यातील समुद्रातून अस्ताला जाणारा सूर्य सांगून जातो.
'उठ.. पुन्हा एक नवा दिवस सुरू झाला आहे'...! एका नव्या आशेचा उदय होईल असं जणू सूर्यचं आपल्याला सांगत आहे याची अनुभुती देतो.