Ganeshprasad Gogate
आयुष्याला रुळावर आणण्यासाठी सगळ्यात पहिले तुम्हाला स्वतःला शिस्त लावयला हवी. यासाठी तुम्ही एक वेळापत्रक बनवून ते काटेकोरपणे पाळायला हवे. जेव्हा तुम्ही हे नियमित फॉलो कराल तेव्हा तुम्हालाच छान वाटू लागेल.
प्रत्येकाला वेळेचे नियोजन करता यायलाच हवे. जर ते जमले नाही तर दैनंदिन कामकाजातील ताण वाढेल. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या जीवनाचा कंट्रोल घ्यायचा असेल तर कामांचं आणि वेळेचं नियोजन आवश्यक आहे.
स्वतःच्या कृतीची जबाबदारी घ्यायला शिका. जेव्हा तुम्ही तुमच्या कामाची जबाबदारी घ्यायला लागाल तेव्हा तुम्ही तुमचं काम मनापासून कराल. त्यामुळे आयुष्यात चांगल्या प्रकारे पुढे जाऊ शकाल.
नकारात्मक विचार बाजूला करा -
जेव्हा आपलं आयुष्य कंट्रोलमध्ये नसतं तेव्हा आपल्याला नकारात्मक विचार यायला सुरुवात होते. जेव्हा नकारात्मक विचार येईल तेव्हा सकारात्मक विचार जाणूनबुजून करा. ही क्रिया सरावाने जमेल.
एक ध्येय निश्चित करा. जेव्हा तुम्ही ध्येय ठरवता तेव्हा ते मिळवण्याची नवी आशा निर्माण होते. त्यासाठी मेहनत घेण्याची इच्छा होते, प्रयत्न होतात. त्यामुळे गोष्टी प्लॅन करून पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.
एक गोष्ट जी तुम्हाला कायम नकारात्मक विचारांपासून दूर ठेवते ती म्हणजे नवीन काही शिकण्याची इच्छा. त्यामुळे जीवन रुळावर नाही असं वाटेल तेव्हा काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा. छंद जोपासा.