Ganeshprasad Gogate
अनेकदा पेनकिलर, डिप्रेशन, उच्च रक्तदाब तसेच इतरही काही औषधं घेतल्यानं बद्धकोष्ठतेचा विकार जडू शकतो. त्यामुळे सतत औषधं घेण टाळा.
एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा लिंबाचा रस, एक चमचा आल्याचा रस मिसळून रिकाम्यापोटी प्यायल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो.
रात्री झोपण्यापूर्वी दोन चमचे गुलकंद खाऊन त्यावर एक ग्लास गरम दूध प्यावे. हा उपाय आठवडाभर करावा. यामुळे पचनशक्ती सुधारते.
मनुके ग्लासभर दुधात घालून दूध उकळवावे. रात्री झोपताना त्या चावून खाव्यात त्यावर गरम दूध प्यावे. असे केल्यास जुनाट बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो.
मोड आलेल्या कडधान्यांमध्ये फायबर असते. यामुळे बिघडलेली पचनशक्ती सुधारून अन्नपचन योग्य पद्धतीने होते. शारीरिक क्रिया सुरळीत होण्यात मदत होते.
जेवल्यानंतर पोट जड वाटत असेल तर पुदिन्याची ताजी पाने चावून खा. तसेच पुदिन्याची पाने घातलेला चहा प्या. यामुळे पचनक्रियेशी संबंधित तक्रारीत आराम मिळतो.