Pramod Yadav
एक मेगावॅटपेक्षा अधिक वीजभार घेणाऱ्या ग्राहकांना सकाळी आणि मोक्याच्या वेळी राज्यातील सौर प्रकल्पांकडून थेट वीज खरेदी करता येणार आहे.
सौर ऊर्जा निर्मितीला चालना देऊन उत्पादन वाढवण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने खुली विक्री (Open Access) उपक्रमाला मंजुरी दिली आहे.
गोवा राज्य सौर ऊर्जा धोरण 2017 मध्ये दुरुस्तीला राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी मंजुरी दिली आहे.
ओपन एक्सेस उपक्रमाखाली राज्याच्या एकूण विजेच्या गरजेपैकी कमाल 15 टक्के ग्राहकांना ओपन एक्सेसच्या माध्यमातून थेट खरेदी करण्याची मुभा दिली जाणार आहे.
धोरण जारी झाल्यानंतर 24 महिन्यांत प्रकल्प उभारणे आवश्यक आहे.
उत्पादकाला पहिल्या वर्षी एकूण उत्पादनाच्या 20 टक्के ऊर्जा आणि तिसऱ्या वर्षी 40 टक्के ऊर्जा बॅटरी आधारित साठवणूक यंत्रणेद्वारे स्थापन करावी लागेल.
बॅटरी आधारित साठवणूक यंत्रणेतून ग्राहकांना दिवसा तसेच मोक्याच्या वेळी म्हणजे संध्याकाळी 06 ते रात्री 11 या दरम्यान वीज घेण्याची मुभा असेल.