Manish Jadhav
गोव्यात यंदा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.
गोव्यात राजधानी पणजीसह अनेक ठिकाणी साजीरं-गोजीरं रुपातील गणेश मूर्ती पाहायला मिळतायेत.
मडगाव नगरपालिका उद्यानात दरवर्षी गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना केली जाते. यंदाची गणपती मूर्ती मनमोहीत करणारी आहे.
निसर्गाच्या सान्निध्यात वसलेल्या नेत्रावळी गावातील तुडव येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने संपूर्ण पर्यावरणपूरक असा वेद व्यास ऋषी आणि गणपती महाभारत लिहिण्यासाठी बसले आहेत, असा देखावा केला आहे. यंदा मंडळाचा 26 वा गणेशोत्सव आहे.
पिंपळकट्टा-मडगाव येथील सार्वजनिक गणपतीचा देखावा बघणाऱ्याला प्रफुल्लीत करणारा आहे. मनाला भावणारं गणपतीचं रुप प्रसन्न करतं.
गणेशोत्सवात गोमंतकीयांचा कमालीचा उत्साह पाहायला मिळतोय. गोव्यात ठिक-ठिकाणी गणेश मंडळे विविध कलाकृती साकारतायेत.