Goa Diwali: गोव्यातील प्रत्येक घरामध्ये आता आढळतील 'हे' दिवाळी स्पेशल पदार्थ

गोमन्तक डिजिटल टीम

दिवाळीचं वातावरण

सध्या सगळीकडेच दिवाळीचं वातावरण आहे आणि म्हणूनच जर का गोव्यात असाल तर 'यांपैकी' काही प्रकार तुम्ही नक्कीच चाखले पाहिजेत.

शंकरपाळी

मैदा आणि साखरेपासून बनवलेला हा पदार्थ दिवाळी फराळात फारच महत्वाचा असतो.

चुरमुरी

चुरमुरी म्हणजे चुरमुऱ्यांचा लाडू. चुरमुरे आणि गूळ यांच्यापासून बनवलेला हा लाडू भारीच रुचकर लागतो.

बेसन लाडू

बेसन लाडू हा तसा सगळीकडेच चर्चेत असतो मात्र गोव्यातील गोड-खाऊ व्यक्तींचा हा आवडता पदार्थ आहे हे लक्ष्यात ठेवा.

करंजी

गोवा म्हटलं म्हणजे नारळ हा आलाच. इथला प्रत्येक पदार्थ नारळाशिवाय अपूर्ण असतो मग करंज्या नसून कसं चालेल?

साखरेचे पोहे

गोवा आणि दिवाळीचे पोहे यांचं खास नातं आहे. पोहे तळून त्यावर साखर लावलेला हा पदार्थ नकीच खाऊन बघावा असा असतो.

चकली

दिवाळी पदार्थांमधला महत्वाचा पदार्थ म्हणजे चकली. तुम्ही भाजणीची चकली इतरत्र खाल्ली असेल मात्र तांदळाच्या पिठापासून बनवलेली चकली खायची असेल तर गोव्याला नक्कीच जाऊन या...

आणखीन बघा