Akshay Nirmale
उत्तर गोव्यातील मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून देहरादूनसाठी पहिल्या विमानाने मंगळवारी उड्डाण केले.
आठवड्यातील तीन दिवस मंगळवार, गुरूवार आणि शनिवारी ही फ्लाईट असणार आहे.
गोव्याचे पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांच्या उपस्थितीत या विमानसेवेचा प्रारंभ झाला. खंवटे हे या पहिल्या फ्लाईटने देहरादूनला गेले. त्यांचे विमानातील फोटोज व्हायरल झाले होते.
मंत्री रोहन खंवटे यांचे देहरादून विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आले.
देहरादून विमानतळावर मंत्री खंवटे यांच्या हस्ते केक कापून या विमानसेवेचा आनंद व्यक्त करण्यात आला.
या विमानसेवेसाठी जीएमआर आणि इंडिगो यांनी करार केला आहे.
स्थानिकांसह दोन्ही ठिकाणच्या आंतरराष्ट्रीय पर्यटकांना या विमानसेवेचा लाभ होणार आहे.