Sameer Amunekar
गोव्यातील नारळाच्या बागायती आजोबा, वडील यांच्या पिढीने तयार केल्या आहेत. माडाचे आयुर्मान ६० ते १०० वर्षे असते. परंतु, ७० वर्षांनंतर त्याच्याकडून उत्पन्न कमी मिळत जाते.
इतर देशांमध्ये माडाचे आयुर्मान ६० वर्षांवर गेल्यानंतर त्याच्या बाजूला दुसरा माड लावला जातो. पाच ते दहा वर्षांनंतर नव्या माडापासून उत्पादन मिळण्यास सुरुवात झाल्यानंतर जुना माड कापला जातो. गोव्यात तसे होताना दिसत नाही.
राज्यात जमिनीचे दर, महागाई वाढत आहे. त्यामुळे जमीन विकत घेऊन नारळाच्या बागायती तयार करण्यास नवी पिढी तयार नाही.
माकड, रानडुक्कर, गवे आदी जंगली प्राण्यांमुळे नारळाच्या पिकांची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. माकडांमुळे तर ५० टक्के उत्पादन घटत आहे.
गेल्या काही वर्षांपासून नारळाला कीड लागत आहे. त्यामुळे त्याची वाढ होत नाही. परिणामी, अशा नारळांची विक्री होत नाही.
बागायतींत काम करण्यासाठी मनुष्यबळ मिळत नाही. किंबहुना माडावरून वेळेत नारळ उतरण्यासाठी पाडेली मिळत नाहीत.
पूर्वीचे पाडेली माडावर चढल्यानंतर कीड वगैरे आढळून आल्यास तत्काळ त्याची माहिती शेतकऱ्यांना देत होते. त्यामुळे शेतकरी तत्काळ उपाययोजना करून माड वाचवत होते. आताचे बहुतांशी पाडेली बाहेरच्या राज्यांतील आहेत. त्यांना याबाबतचा अभ्यास नाही.