Kavya Powar
डिसेंबर महिन्यात गोव्यात ख्रिसमसनिमित्त पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी वाढते.
यादरम्यान ड्रिंक अँड ड्राईव्हच्या अनेक घटनाही सातत्याने घडत असतात.
प्रामुख्याने या घटना रात्रीच्या वेळी घडत असतात. मात्र सध्या त्या भर दिवसाही घडत असल्याने चिंतेचे कारण बनले आहे
गोव्यात येणारे पर्यटक वाहतूक नियमांचे पालन करत नसल्याचे दिसून आले आहे
याबाबत 26 मद्यपी चालकांवर कारवाई करण्यात आली आहे.
तुम्ही जर याकाळात गोव्यात येत असाल आणि मद्यप्राशन केले असेल तर स्वत:हून वाहन न चालवण्याचा सल्ला सरकार आणि वाहतूक विभागातर्फे देण्यात आला आहे.
धमाल-मजामस्ती करून झाल्यानंतर तुमच्या वास्तव्याच्या ठिकाणी परतण्यासाठी तुम्ही cab चा वापर करा
जर तुम्ही हे नियम पाळले नाही तर तुमच्यावरही कारवाई होऊन वाहन जप्त होऊ शकते