गोमंतक ऑनलाईन टीम
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यांच्या साखळी येथील घरी रक्षाबंधन सण उत्साहात साजरा केला.
मुख्यमंत्र्यांच्या सख्या बहिणीने त्यांंचे औक्षण केले. पारंपरिकरित्या घरातील सर्वांनी एकत्र येत त्यांच्या घरी हा सण साजरा झाला.
दरम्यान, राज्याचे प्रमुख असल्याने बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी राज्यभरातून अनेक भगिनी राखी घेऊन आल्या होत्या.
मुख्यमंत्र्यांना राखी बांधण्यात शाळेतील विद्यार्थिनींसह विशेष विद्यार्थिनींही सहभाग झाल्या.
बह्माकुमारी संस्थेच्या वतीनेही या संस्थेतील बहेणजींनी मिळून मुख्यमंत्र्यांना राखी बांधली.
भाजप महिला मोर्चातील अनेक महिलांनी एकत्र येत मुख्यमंत्र्यांना राखी बांधत त्यांच्याकडून महिलांच्या रक्षणाची हमी घेतली.
या सर्व भगिनींसोबतचे रक्षाबंधनाचे फोटोज सोशल मीडियात व्हायरल झाले होते.