Kavya Powar
गोव्यातील अनेक आकर्षणांपैकी एक असलेले कार्निव्हल आता जवळ आले आहे.
यंदाची पणजीतील कार्निव्हल ‘फ्लोट परेड’ 10 फेब्रुवारीला होणार आहे.
आयोजनासाठी महानगरपालिकेची गतवर्षी असणारी समिती कायम ठेवण्यात आली आहे.
या समितीचे अध्यक्षपद महापौर रोहित मोन्सेरात यांच्याकडे असून, उपाध्यक्षपद आयुक्त क्लेन मेदेरा यांच्याकडे आहे.
तसेच फ्लोट परेडनंतर सांबा स्क्वेअरमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे
कार्निव्हल आणि यादरम्यान असलेले कार्यक्रम पर्यटक आणि स्थानिकांसाठीही आकर्षण असतात.
कार्निव्हलवेळी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने यावेळी आपल्या सर्वांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.