Kavya Powar
गोव्याला केंद्रीय कराच्या वाट्यातून या सालामध्ये 445 कोटी रुपये जादा मिळणार आहे.
यंदा राज्याला 4708 कोटी रुपये राज्याला मिळतील, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला.
या अर्थसंकल्पामुळे राज्यातील आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि वेलनेस टुरिझमला चालना मिळणार आहे.
गुरुवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.
पर्यटन क्षेत्राकडून या अंतरिम अर्थसंकल्पाचे जोरदार स्वागत झाले आहे.
आजपासून (2 फेब्रुवारी) गोव्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले आहे
8 फेब्रुवारीला मुख्यमंत्री अर्थसंकल्प सादर करणार आहेत