गोमन्तक डिजिटल टीम
गोव्यात आल्यावर फिश करीचा नक्की आस्वाद नक्की घ्या. अनेक पर्यटक गोव्यात खास करून फिश करीवर ताव मारण्यासाठीच येत असतात.
गोव्यात तुम्ही सीफुडचा आस्वाद घेऊ शकता. तुम्ही गोव्यात आल्यावर प्रॉन्स खाऊ शकता.
विशिष्ट रंगाचा मसाला या पदार्थामध्ये वापरला जातो. कॅफेरियल चिकन हा गोव्यातील लोकप्रिय पदार्थ आहे
जगभरातील लोकांना गोव्याच्या शैलीत बनवलेली फिश करी आवडते. पोम्फ्रेट फिश करीला आंबट-तिखट चव येण्यासाठी कच्च्या आंब्याचा वापर केला जातो.
फिशफ्राय म्हटलं की न खाणार्यांच्याही तोंडाला पाणी सुटतं. गोव्यात तुम्ही रवा फ्राय फिशचा आनंद घेउ शकता.
विंदालू आज गोव्याच्या खाद्यसंस्कृतीची ओळख बनलीय. हा पदार्थ बनवण्यासाठी कांदे, मिरची, लसूण, व्हिनेगर आणि इतर मसाले वापरले जातात.
गोव्यात अनेक ठिकाणी मिसळ पाव मिळते. येथे तुम्ही मिसळ पाव देखील ट्राय करु शकता.