Pramod Yadav
आता गोव्यात समुद्र किनाऱ्यांवर लग्न करणाऱ्यांना जादा पैसे मोजावे लागणार आहेत.
गोवा किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने (सीझेडएमए) ने याबाबत निर्णय घेतला आहे.
सीझेडएमएने किनाऱ्यांवर लग्नासाठी तात्पुरते उभारण्यात येणाऱ्या बांधकामांसाठी तसेच परवान्यांसाठीच्या शुल्कात दुप्पट वाढ केली आहे.
बीच वेडिंग म्हणजेच किनाऱ्यावरील लग्नसोहळ्यासाठी तसेच किनाऱ्यांवरील इतर कार्यक्रमांसाठी एक लाख रूपये शुल्क एका दिवसासाठी आकारले जाणार आहे.
यापुर्वी किनाऱ्यावरील लग्नसोहळ्यासाठी प्रतिदिन 50 हजार रूपये शुल्क आकारले जात होते.
प्राधिकरणाकडून शॅक्ससाठी आता प्रती चौरस मीटर 500 रूपये शुल्क आकारले जात होते. तथापि, नव्या दरांनुसार आता 1000 रूपये प्रती चौरस मीटर आकारले जाणार आहे.
किनाऱ्यावर झोपडी आणि कॉटेजसाठी प्रती चौरसमीटर 100 रूपये दर पुर्वी होता आता तो दर 500 रूपये प्रती चौरस मीटर असणार आहे.