Kavya Powar
ख्रिसमस आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने डिसेंबर महिन्यात गोव्यात येत असतात
यावेळी पर्यटक समुद्रात बुडण्याच्या घटनाही समोर येत असतात. या ख्रिसमस विकेंडला राज्यातील किनारपट्टीवर सेवा पुरवणाऱ्या दृष्टीच्या जीवरक्षकांनी तिघांना बुडताना वाचवले. अनेकांना मौलिक मदत केली.
जीवरक्षक आपला जीव धोक्यात घालून सेवा देतात.
मिरामार येथील समुद्रात खोलवर गेलेल्या हैदराबादच्या एका महिलेला बुडताना वाचवले.
सिकेरी येथे समुद्रात उतरलेल्या नाशिकच्या चार पर्यटकांपैकी दोघांना बुडताना वाचवले
तसेच हरमल येथे हैदराबादमधील एका ३१ वर्षीय व्यक्तीचा पाण्यात उतरल्यावर पाय निसडून जखमी झाला होता. जीवरक्षक दत्ताराम, मनोज, प्रियेश आणि नामदेव यांनी प्रथमोपचार करून त्याला आपत्कालीन सेवेकडे सुपूर्द केले.
पाळोळे बीचवर उलट्या होत असलेल्या आणि श्वास घेण्यास असमर्थ असलेल्या मुलीला वाचवण्यासाठी जीवरक्षकांना पुढाकार घेतला व तिला दृष्टी मरिन जीपमधून जवळच्या आरोग्य केंद्रात हलवले.
जर तुम्हीही गोव्यात मजामस्ती करण्यासाठी येत असाल आणि समुद्रात जाणार असाल तर खबरदारी घेणे महत्वाचे आहे