Sameer Panditrao
विविधतेने नटलेला गोवा आता खचाखच भरलेला आहे.
गोव्यातील किनाऱ्यांवर आता पर्यटकांची गर्दी उसळलेली दिसत आहे.
सुंदर किनाऱ्यांवरून सनसेट पाहणे सगळ्यांना आवडते.
संध्याकाळच्या प्रकाशात किनारी परिसर फार वेगळा दिसतो.
मच्छिमारांची लगबग, बोटी यांमुळे किनारे आपल्याला जिवंत वाटू लागतात.
संध्याकाळ पुढे जाईल तशी किनाऱ्यांवरती बोटींची संख्या वाढू लागते.
अशी रम्य संध्याकाळ जाणे हे आजकाल स्वप्नवतच आहे. किनाऱ्यांवरील संध्याकाळ गोव्याला खरंच खास बनवते.