Sameer Panditrao
१९८०-९० च्या दशकातील गोव्याचे दुर्मिळ फोटो सोशल मीडियावर पुन्हा चर्चेत आले आहेत.
या व्हायरल छायाचित्रांमध्ये शांत आणि निसर्गरम्य हरमल किनारा स्पष्टपणे दिसून येतो.
उंच नारळाची झाडे, स्वच्छ वाळू आणि गर्दीविना किनारा त्या काळाची साक्ष देतात.
पर्यटनाचा व्याप कमी आणि स्थानिक जीवनशैली अधिक साधी दिसून येते.
आजच्या आधुनिक गोव्याशी तुलना केली असता मोठा बदल जाणवतो.
जुन्या गोव्याच्या आठवणींना उजाळा देत हे फोटो नेटकऱ्यांना भावूक करत आहेत.
हरमल किनाऱ्याचे हे ऐतिहासिक फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहेत.